राज्यातील कारागृहात विविध उद्योग काम करणाऱ्या ७ हजार कैद्यांची पगार वाढ करण्यात आली आहे. ५ ते ७ रुपयांची पगार वाढ कैद्यांना देण्यात आली आहे. ही पगार वाढ २० ऑगस्ट २०२३पासून लागू करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहांचा समावेश आहे. पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह असून पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहेत. या कारागृहात न्यायबंदी आणि शिक्षा झालेले सध्यस्थीतीत जवळपास ४० हजार कैदी आहेत.
राज्यातील विविध कारागृहात सर्व प्रकारचे उद्योग,शेतीउद्योग, सुतारकाम,लोहारकाम, शिवणकाम,चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, कागदकाम, फाउंड्री, कार वॉशिंग सेंटर, इस्त्री काम,गॅरेज ,उपहारगृहे इत्यादी उद्योग केली जातात.शिक्षा झालेल्या कैद्यांना या ठिकाणी रोजगार दिला जातो.
हे ही वाचा:
टोमॅटोचे दर घसरले; मुंबईत ६० ते ८० रुपये किलो
उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत
अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला
राहुल गांधी ‘वास्तू’वर तोडगा काढतायत…
कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमवतात व कैदी त्यातून स्वतः साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपहारगृहातून खरेदी करतात तसेच स्वतःच्या कुटुंबियांना त्यांचे अडीअडचणी च्या वेळी पोस्टाच्या माध्यमातून मनिऑर्डर करतात ,काही कैदी सदर मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात अश्या अनेक कामांसाठी कैद्यांना स्वतः खर्च भागवता येतात,त्यामुळे कैद्यांमध्ये स्वावलंबाची भावना निर्माण होते. तसेच या उद्योगातून उत्पादनाची बाजारात सामन्यासाठी विक्री करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शासनाला देखील मोठा महसूल प्राप्त होत असतो.
विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठराविक कालावधी नंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना पगारवाढ देण्यात यावी यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता (कारागृह व सुधारसेवा ) यांनी २० ऑगस्ट २०२३ रोजीपासून राज्यातील कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व कैद्यांना पगारवाढ लागू करणेबाबत आदेश जारी केले आहेत.
कुशल कैदी – पूर्वी ६७ रुपये वाढ होऊन ७४ रुपए,अर्धकुशल कैदी- पूर्वी ६१ रुपये वाढ होऊन ६७रुपये,अकुशल बंदी – पूर्वी ४८ वाढ होऊन ५३ रुपये, खुल्या वसाहतीतील कैद्यांना पूर्वी ८५ वाढ होऊन ९४ रुपये वाढ झाली आहे. या पगारवाढीचा लाभ ७००० कैद्यांना होणार असल्याचे कारागृह अधिकारी यांनी म्हटले आहे.