झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

बॅरेक मधील झोपण्याची दोन इंच जागा कमी केल्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील एका कैद्याने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे, या तक्रारीवरून विशेष मोक्का तुरुंग अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दाऊद टोळीत सामील झालेल्या रामदास रहाणे याला २०१७ मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला होता. रहाणे हा सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक क्रमांक ६/४ मध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक कैद्याला बॅरेक मध्ये २×६ फूट अशी जागा झोपण्यासाठी दिली जाते. रहाणे याने गेल्या महिण्यात विशेष मोक्का न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत तुरुंग प्रशासनाने कैद्यांची झोपण्याची जागा कमी केली असल्याचे नमूद केले होते.

असा दावा करण्यात आला आहे की, रहाणेला बॅरेक क्रमांक ६(४) मध्ये ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणी कैद्यांची संख्या वाढल्याचे प्रत्येक कैद्यांची फक्त दोन इंच जागा कमी करण्यात आली असल्याचे एका अधिकारी यांनी म्हटले आहे. एका कैद्याला बॅरेकमध्ये झोपण्यासाठी २.६ फूट जागा मिळते, असा दावा केला जात असला तरी कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे जागा कमी करावी लागली असे ही अधिकारी यांनी म्हटले आहे.

४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना जागा कमी करू नये आणि शक्य असल्यास रहाणेला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवावे असे आदेशात म्हटले होते. तुरुंग प्रशासनाने रहाणेला बॅरेक १ मध्ये हलवण्याची तयारी दर्शवली, मात्र त्याने ती नाकारली.

रहाणे यांचे वकील, फरहाना शाह यांनी असा युक्तिवाद केला की “बॅरेक क्रमांक १ मध्ये दाऊद इब्राहिम कासकरच्या डी-कंपनीशी संबंधित इतर गुंड आहेत आणि जर त्याला बॅरेक क्रमांक १ मध्ये हलवले गेले तर रहाणे त्यांच्या संपर्कात येईल. त्याला अनावश्यकपणे डी-कंपनीच्या सदस्यांसह इतर प्रकरणात अडकवले जाईल.म्हणून, त्याला बॅरेक क्रमांक १ मध्ये हलवू नये अशी विनंती केली.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, “त्याची तब्येत आणि हृदयाचे आजार लक्षात घेऊन, तुरुंग प्राधिकरणाने त्याला झोपण्यासाठी पुरेशी जागा देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!

परंतु रहाणे याला पुरेशी जागा न मिळाल्याने तसेच तुरुंग अधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मंगळवारी रहाणेने तुरुंग अधिकाऱ्यां विरुद्ध पुन्हा विशेष न्यायालयात धाव घेतली.राहणेच्या या याचिकेला उत्तर देताना त्यांचे वकील शाह यांनी सांगितले की, न्यायालयाने तुरुंग प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Exit mobile version