27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाकरकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!

करकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रसाद पुरोहित यांचा लेखी जबाबातून दावा

Google News Follow

Related

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणी खळबळजनक असा दावा केलेला आहे. एनआयए न्यायालयात त्यांनी दावा करत म्हटले आहे की, “दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचे मान्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप करण्यासाठी दबाव टाकला गेला, असा खळबळजनक दावा प्रसाद पुरोहित यांनी केला आहे.

मुंबईतल्या सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात प्रसाद पुरोहित यांचा २३ पानांचा लेखी जबाब सादर करण्यात आला. राजकीय दबाव असल्याने एटीएसने खोटी केस दाखल केली असा आरोप पुरोहित यांनी आपल्या लेखी जबाबात केला आहे. तत्कालीन सरकारच्या राजकीय कथनानुसार एटीएसने हे प्रकरण रचले होते. तेव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची सत्ता होती. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. पुरोहित यांनी दावा केला की त्यांच्या चौकशीदरम्यान करकरे आणि परमबीर यांनी बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचे मान्य करण्याचा आग्रह धरला होता.

आरोपी प्रसाद पुरोहितने कलम ३१३ च्या अंतर्गत निवेदन सादर केलं आहे. तत्कालीन सरकारच्या राजकीय विचारसरणीला अनुरूप एटीएसने बनावट केस तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुरोहित यांनी निवेदनात म्हटले आहे की, एटीएसने ऑक्टोबर २००८ मध्ये ताब्यात घेतले होते आणि खंडाळा येथे नेऊन करकरे, परमबीर सिंग आणि इतर एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. करकरे आणि सिंग यांनी बॉम्बस्फोटाच्या कटाची कबुली देण्यासाठी दबाव टाकला आणि शारीरिक छळ केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका तारखा जाहीर’

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!

मुंबई पोलिसांच्या हाती पैशाचं घबाड, नाकाबंदी दरम्यान व्हॅनमधून सापडले ४ कोटी ७० लाख रुपये!

२९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास मालेगावमधील गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती. बॉम्बस्फोट होण्याच्या दोन वर्षांआधी २००६ मध्ये शहरातील बडा कब्रस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला. तर ३०० हून जास्त रहिवासी जखमी झाले होते. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात दोन बॉम्बस्फोट आणि ३८ बळी गेले. तसेच या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि त्यासाठी २००३-०४ मधलं आरडीएक्स वापरल्याचा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा