मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसोबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पाहिला ‘द केरळ स्टोरी’

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला या मुलीला दिला होता.

मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसोबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पाहिला ‘द केरळ स्टोरी’

भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या १९ वर्षीय मुलीसोबत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. भोपाळमधील या नर्सिंगच्या विद्यार्थिनीला प्रज्ञासिंह यांनी तिच्या प्रियकरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

भोपाळमधील १९ वर्षीय नर्सिंगची विद्यार्थिनी तिच्या लग्नाआधीच प्रियकर युसूफसोबत पळून गेली होती. या मुलीला भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी या मुलीला नेले. या चित्रपटाची कथा एका हिंदू महिलेवर बेतली आहे. ही भूमिका अभिनेत्री अदा शर्माने केली आहे. इस्लामचा स्वीकार करण्यासाठी तिचे ‘ब्रेनवॉश’ केले जाते आणि तिला सीरियाला पाठवले जाते, जिथे तिला दहशतवादी संघटना आयएसमध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता.

हे ही वाचा:

विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह

किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले

राज्यात पुन्हा औरंगजेब ‘नाचला’

आज शिवराय छत्रपती झाले!

भोपाळच्या नया बसेरा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, युसूफ हा त्यांचा शेजारी आहे. ३० मे रोजी या मुलीचे लग्न होणार होते. मात्र लग्न होण्याआधीच ही मुलगी युसूफसोबत पळून गेली. जाताना तिने तिच्या लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम आणि दागिनेही घेऊन पळून गेली, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

युसूफने त्यांच्या मुलीला गोड बोलून फसवले आणि नंतर तिच्यासोबत पळून गेला, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी भोपाळच्या कमला नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. युसूफने मुलीच्या नावावर बँकेचे कर्जही घेतले होते, आणि तिला त्याचा मासिक हप्ता भरण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, कुटुंबाच्या आरोपांच्या विरोधात, मुलीने पोलिसांसमोर कबुलीजबाब देताना सांगितले की, ती युसूफसोबत स्वेच्छेने पळून गेली होती. युसुफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version