राष्ट्रीय तपास पथकाचा दावा
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकाने (NIA) न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. या प्रतिज्ञापत्रात NIA ने धक्कादायक दावा केला आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हे एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचे म्हटले आहे.
एन्काऊन्टर स्पेशालिस्ट असलेले प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या इमारतीत रचण्यात आला होता, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच या इमारतीत प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींमध्ये अनेक बैठक पार पडल्याचे सांगण्यात आले आहे. एपीआय सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिले. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर NIA नं हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.
हे ही वाचा:
अजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा
राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
एन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रदीप शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे मुख्य सूत्रधार आहेत आणि सचिन वाझे याने शर्मा यांना त्यासाठी ४५ लाख रुपये दिल्याचे NIA ने सांगितलं आहे. तसेच NIA कडून प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे.