29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाधर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

Google News Follow

Related

धर्मांतरासाठी आपल्या नवऱ्यावर जबरदस्ती करणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात ही घटना घडली असून तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे.

३६ वर्षीय प्रदीप नागेले हे मध्य प्रदेशमधील इंदोर शहराचे रहिवासी. गेल्या काही दिवसांपासून नागेले यांच्यावर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता. नागेले यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारावा यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून प्रयत्न सुरु होता. त्यासाठी त्यांना निरनिराळ्या गोष्टींची प्रलोभने दाखवण्यात येत होती. पण ते तयार नव्हते. त्यांच्या पत्नीने त्यांना ख्रिस्ती धर्म स्विकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लालूच दिली. पण नागेले काही केल्या तयार नव्हते. अखेर संतप्त होऊन त्यांच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबियांनी नागेले यांना मारहाण केली.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

फडणवीसांच्या प्रयत्नाने नागपूरला मिळाला ऑक्सिजन

या घटनेनंतर नागेले यांनी इंदोर येथील द्वारकानाथ पोलीस ठाण्यात आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी प्रदीप नागेले यांनी असाही आरोप केला आहे की त्यांचे धार्मिक पुस्तक कुटुंबीयांनी फाडले. नागेले यांची पत्नी आणि मेव्हणी यांनी एक स्कुटर आणि आर्थिक मोबदला घेऊन धर्मांतर केले असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणात नागेले यांनी एका अनुपम ब्रदरचेही नाव घेतले आहे. ज्याने २५ फेब्रुवारी रोजी नागेले यांना प्रलोभित करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन यात नागेले यांच्या पत्नीसह इतर ९ जणांची नावे आहेत. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे, गुन्हेगारी पद्धतीने दबाव आणणे या प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा