युट्यूब पाहून केला गोळीबाराचा सराव

युट्यूब वर विडियो पाहून केला, पिस्तूल शिकण्याचा प्रयत्न

युट्यूब पाहून केला गोळीबाराचा सराव

कांदिवली येथील रस्त्यावर केलेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आली आहे, सध्या आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून मारेकऱ्यांनी हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून केला असल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच या आरोपींनी युट्यूब पाहून गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सोनू चंद्रभान पासवान आणि सूरज राककिसण गुप्ता अशी कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेत पकडण्यात आलेल्या आरोपींकडे पिस्तूल कसे आले याची पोलिस चौकशी करत आहेत. तसेच शुक्रवारी रात्री उशिरा कांदिवलीतील न्यू लिंक रोड, परिसरातील कल्पवृक्ष इमारतीच्या गेट समोर सोनू आणि सूरजवर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात अंकित इंद्रमणी यादव या २२ वर्षीय एकच तरुणाचं नाव आहे. तर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच मनीष अशोक गुप्ता, नारायण प्रकाश तिरूपति गगणपल्ली आणि अविनाश सुभाष दाभोळकर असे तिघेजण जखमी झाले आहेत. तसेच या घटने संदर्भात वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हा तपासणीचे आदेश दिले आहेत.

तसेच यू-ट्यूब वर व्हिडिओ स्वरूपात दृश्य पाहून गोळीबार करण्याचा सराव करण्यात आला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरुण पिस्तूल आणि बाईक जप्त केली आहे. वापरण्यात आलेले पिस्तूल कोठून आणले व पिस्तूल कोणी दिले याचा तपास पोलिस करत आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून ते दोघेही सूरत येथील बिलीमोरा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणेकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे ही वाचा:

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बिलीमोरा रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून सोनू पासवान आणि सूरज गुप्ता या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दोघांमध्ये पूर्व वैमनस्याचा वाद विकोपाला गेला असल्याचे समोर आले असून, अटकेनंतर दोघांनाही कांदिवली पोलिसांकडे सोपवण्यात आले.

Exit mobile version