प्रभाकर साईल गुरुवारी हजर राहणार एनसीबीसमोर

प्रभाकर साईल गुरुवारी हजर राहणार एनसीबीसमोर

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एका व्हीडिओद्वारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता एनसीबीने त्यांना समन्स बजावले आहे. २८ ऑक्टोबरला त्यांना एनसीबीसमोर हजर राहावे लागेल.

आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीचे अधिकारी पैसे उकळणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे. पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे. याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल करतानाच एका व्हीडिओच्या माध्यमातून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केपी गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यातील बोलणे ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला असून त्यात २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत आपण डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे.

 

हे ही वाचा:

रिझवानने हिंदूंसमोर नमाज अदा केला ही खास बाब

२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई!

आई-बाबा देणार फेसबुक वापरायची परवानगी!

अमरिंदर सिंग उद्या नवीन पक्षाची घोषणा करणार?

 

Exit mobile version