प्रभाकर साईलच्या दाव्यातील सॅम हा सॅम नाहीच!

प्रभाकर साईलच्या दाव्यातील सॅम हा सॅम नाहीच!

मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या २५ कोटीतील ३८ लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हैनिफ बाफना असून प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील व्यापारी हैनिफ बाफना यांचा आहे. ‘मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसाया निमित्त भेटलो होतो. मात्र, माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नसल्याबाबत तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे. माझा प्रोफाईलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला ३८ लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करुन प्रभाकर साईल माझी बदनामी करत आहेत’, असे बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन होत असलेल्या बदनामीबद्दल न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही बाफना यांनी केली आहे.

हे ही वाचा:

‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’

क्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला!

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

एका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहिती दरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. या संभाषणा दरम्यान २५ कोटींची मागणी करुन १८ कोटींवर फिक्स करुन त्यातील आठ कोटी समीर वानखेडेंना देऊ बाकी १० आपण वाटून घेऊ, असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.

Exit mobile version