वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

मुंबईच्या पवईतील घटना

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

पवई पोलिसांनी एका मौलवीला बाल लैगिंग अत्याचार (पोक्सो) प्रकरणी अटक केली आहे. या मौलवीने ११ वर्षांपूर्वी अरबी भाषा शिकण्यासाठी येणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले होते. या प्रकरणी ११ वर्षानंतर पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मौलवीचा शोध घेऊन त्याला चार तासात अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण पुढील तपासासाठी साकिनाका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवई येथील एका नामांकित शाळा आणि महाविद्यालयात गेल्या आठवड्यात शाळेतील आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी समुपदेशन (काउंगसलिंग)चे वर्ग घेण्यात आले होते. या महाविद्यालयात इयत्ता १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीने समुपदेशना दरम्यान ती अवघी ६ वर्षाची असताना तिच्यावर ओढवलेलता प्रसंगाबाबत सांगितले, ही विद्यार्थीनी ६ वर्षाची असताना साकिनाका येथे राहणाऱ्या एका मौलवीकडे अरबी भाषा शिकण्यासाठी जात होती, दरम्यान मौलवी विद्यार्थीनीला भाषेचा टास्क द्यायचा आणि टास्क पूर्ण न झाल्यावर तो तीच्या शरीराला वाईट इराद्याने स्पर्श करायचा हा प्रकार तब्बल दोन वर्षे सुरू होता.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकी प्रकरणी अटक केलेला आरोपी सुजित सुशील सिंगकडून धक्कादायक माहिती उघड!

दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी!

काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

कराचीमधून अपहरण झालेले आठ बलुच विद्यार्थी घरी परतले!

पीडित मुलीने याबाबत कधी कुठे वाच्यता केली नव्हती, अखेर तीने हा प्रकार महाविद्यालयातील समुपदेशनाच्या वेळेस सांगितल्यानंतर शाळेने हे गंभीरपणे घेऊन तात्काळ पवई पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. या अर्जावरून तात्काळ गुन्हा दाखल करून पवई पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोनि.प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संतोष कांबळे यांच्या पथकाने मौलवीचा शोध घेऊन ४ तासात त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. हा गुन्हा साकिनाका पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा साकिनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Exit mobile version