पवई दगडफेक; ५७ जणांची रवानगी तुरुंगात,६ महिलांचा समावेश

दंगल, प्राणघातक हल्ला असे आरोप

पवई दगडफेक; ५७ जणांची रवानगी तुरुंगात,६ महिलांचा समावेश

पवई येथील जयभीम नगर येथे पोलीस आणि मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक केल्याप्रकरणी पवई पोलीस २००हुन अधिक दंगलखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुरुवार आणि शुक्रवारी एकूण ५७ जणांना अटक करण्यात आली होती, त्यात ६ महिलांचा समावेश आहे.अटक करणाऱ्या दंगलखोरांना शुक्रवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पवईतील जयभीम नगर येथे अतिक्रम करून बांधण्यात आलेल्या झोपड्यावर गुरुवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांवर ३००ते ४०० जमावाने दगडाने हल्ला केला, यावेळी जमावाने सोबत पेट्रोल ने भरलेल्या बॉटल्स, मिरची पाणी आणि मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा पूर्वीच करून ठेवला होता.

हे ही वाचा:

मोदींनी कान उपटले! ब्रेकिंग न्यूजने देशचालत नाही!

आदित्य ठाकरेंकडून वरळी निसटतेय का?

हिमाचलमध्ये काँग्रेसच्या पराभवाची हॅट्रिक!

काँग्रेसच्या एक लाख खटाखट… घोषणेवर मोदी बरसले!

या दगडफेकीत पोलीस आणि मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ३५ जण जखमी झाले होते.जखमीमध्ये पोलिसांची संख्या अधिक होती. संतप्त झालेल्या जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक घटनास्थळी दाखल करून २० दंगेखोराना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान पवई पोलिसांनी या प्रकरणी २०० पेक्षा अधिक जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बेकायदेशीरपणे एकत्र येणे, दंगल, प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचारी यांना त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ६ महिलांसह ५७जणांना अटक करण्यात आली असून त्यांना अंधेरी न्यायालयात आज हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Exit mobile version