हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमधील एका कॉन्स्टेबलचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला. प्रवासादरम्यान खड्ड्यांमुळे गाडीला हादरे बसले आणि त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटून ती जवानाला लागल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पप्पाला भानूप्रसाद असे या मृत जवानाचे नाव आहे.
एका कामासाठी भानूप्रसाद हे गाडीतून प्रवास करत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांच्या गाडीला हादरे बसले. या हादऱ्यांमुळे त्यांच्या हातातील रायफलमधून गोळी सुटून ती थेट त्यांच्या छातीत घुसली. ही घटना घडल्यानंतर जवानाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत जवानाचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश
शिवचरित्र हा श्वास, राष्ट्रनिर्मितीचा ध्यास
अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन
‘तपास सीबीआयकडे दिल्यास परमबीर हजर होतील’
पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भानूप्रसाद हे डिपार्टमेंटच्या गाडीतून हैदराबादहून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी नांदेडकडे रवाना होत होते. चालक आणि ते गाडीतून जात असताना डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर ही घटना घडली. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने त्यांच्या रायफलमधून गोळी सुटली.