कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर

कोलकात्यातील पीडित तरुणीच्या शरीरावर १४ जखमा, बलात्कार, हत्या झाल्याचे सिद्ध

कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर त्याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यात बलात्कार, हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे. शिवाय, त्या तरुणीच्या अंगावर १४ गंभीर स्वरूपाच्या जखमाही आढळल्या आहेत.

या शवविच्छेदन अहवालानुसार या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. शिवाय, या तरुणीवर बळजबरी करण्यात आली आहे, हेदेखील गुप्तांगांच्या तपासणीवरून स्पष्ट होते आहे. या अहवालात हेदेखील नमूद करण्यात आले आहे की, तिच्या फुफ्फुसात तसेच शरीरात अनेक ठिकाणी रक्तस्राव झाल्याचे दिसते आहे. पण कोणतेही हाड मोडलेले नाही हेदेखील स्पष्ट होत आहे. रक्ताचे नमुने, शरीरातील इतर स्रावही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ज्या जखमा या तरुणीच्या शरीरावर झालेल्या आहेत त्यानुसार तिच्या नाकाला, जबड्याच्या उजव्या बाजूला, डाव्या हाताला आणि खांद्याला जखमा झालेल्या दिसतात. तिने आरोपीशी प्रचंड संघर्ष केल्याच्याही खुणा दिसत आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुख, संजय राऊतांचे गँग भोजन…नितेश राणेंनी शेअर केले फोटो !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईनुद्दीनला अटक

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे नागरिकत्व मागणाऱ्यांना न्याय नाही

साक्षीदारांनी म्हटले होते की, सदर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलच्या मंचावर तिचा मृतदेह निपचित पडलेला होता. निळ्या रंगाची एक चादर तिच्या मानेपासून ढोपरांपर्यंत होती. तिचा लॅपटॉप, वही, मोबाईल फोन आणि पाण्याची बाटलीही तिथेच पडलेली होती. तिने आरोपीशी केलेल्या संघर्षामुळे आणखी काही पुरावे सापडणार आहेत. ज्या रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, त्याच्या शरीरावर ओरखडे आढळले आहेत.

या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, पीडित तरुणी ही झोपेत असल्यामुळे आरोपीला तिच्यावर हल्ला करणे अधिक सोपे गेले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून यासंदर्भात २० ऑगस्टला ते याबाबत टिप्पणी करणार आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि जे. बी. पारडीवाला व मनोज मिश्रा यांचे खंडपीठ या प्रकरणावर बोलणार आहेत.

Exit mobile version