25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामामुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर

मुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर

चारही मृतांना एकूण ११ गोळ्या लागल्या

Google News Follow

Related

मुंबई- जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना गोळ्या लागल्याने या चौघांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मृतांच्या मुख्यत्वे करुन डोक्याला आणि छातीत गोळ्या लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईतील सर जे जे रुग्णालयात या चारही जणांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. चारही मृतांना एकूण ११ गोळ्या लागल्याचे अहवालात म्हटलं आहे. आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर असगर अब्बास शेख यांना तीन गोळ्या तसेच मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला आणि सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांना प्रत्येकी दोन गोळ्या लागल्या होत्या. महत्त्वाच्या अवयवांना गोळ्या लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

आरपीएफ शिपाई चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी- ५ कोचमध्ये टिकाराम मीणा, बी- ४ कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांची हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.

हे ही वाचा:

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मणिपूर हिंसाचाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; जीएसटी संकलनात घट

इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !

आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’

दरम्यान, मुंबई- जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवार, ३१ जुलैच्या पहाटे ही दुर्घटना घडली. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह चार जणांचा मृत्यू झाला. मारेकरी चेतन हा आरपीएफ शिपाईच होता, जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्याच ट्रेनमध्ये तैनात होता. आरोपी शिपाई चेतन सिंह याला जीआरपीने अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा