26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाकॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओने उडवला गोंधळ

कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओने उडवला गोंधळ

Google News Follow

Related

पश्चिम उपनगरातील एका प्रतिष्ठित कॉलेजचे ऑनलाइन लेक्चर सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. ६० ते ६५ विद्यार्थी हे लेक्चरमध्ये असतांना नेमका व्हिडीओ कोणी टाकला याचा शोध आता पोलीस घेत आहे. जुहू पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हॅकर विरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी असलेल्या एका प्रतिष्ठित कॉलेजचे ऑनलाइन वर्ग भरले होते, या ऑनलाइन वर्गात सुमारे ६० ते ६५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ऑनलाइन लेक्चरला उपस्थित होती. महत्वाचा विषय असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी शिक्षक सांगत होते ते प्रत्येक जण स्क्रीन वर बघून ऐकत अचानक स्क्रीनवरपॉर्न व्हिडीओ सुरू झाला, अचानक स्क्रीनवर आलेल्या पॉर्न व्हिडीओ मुळे एकच गोंधळ उडाला.अनेकांनी ताबडतोब आपली स्क्रीन बंद करून ऑडिओमार्फत हे काय चाललंय म्हणून अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

स्वप्नातल्या घरासाठी सामन्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!

पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने

बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?

या पॉर्न व्हिडीओची दखल कॉलेज प्रशासनाने घेऊन जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जुहू पोलिसांनी प्रथम अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मात्र हा प्रकार विद्यार्थी अथवा शिक्षक यापैकी कोणीही केला नसल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

हा सायबर हॅकरचा प्रकार असून सायबर हॅकरने कॉलेजचा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करून कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडिओ टाकला असल्याची शक्यता जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली आहे. या प्रकरणी सायबर सेल पोलिसांची मदत घेऊन या हॅकरचा शोध घेण्यात येत असल्याचे माने यांनी सांगितले.

ऑनलाईन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओ टाकणे, अश्लील कृत्य करणे हे प्रकार मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू असून काही आठवड्यापूर्वी सकिनाका पोलिसांनी अश्याच एका गुन्हयात राजस्थान येथून १४ वर्षाच्या एका मुलाला अटक केली होती. त्याने एका शाळेच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये पऑनलाइन प्रवेश मिळवून भर लेक्चरमध्ये शिक्षकेच्या समोर अश्लील कृत्य केले होते. या प्रकारच्या अनेक तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत असून अनेक शाळा, क्लासेस बदनामीच्या भीतीमुळे तक्रार देखील दाखल करीत नाही अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा