मुंबई एसआयटी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पूजा ददलानीच्या जबाबानंतर हालचालीला येणार वेग येणार आहे. पण शाहरुख खानची पीए असलेल्या पूजा दादलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने समन्स पाठविल्यानंतर आजारी असल्यामुळे ती उपस्थित राहणार नाही.
मुंबई पोलिसांच्या एसआयटीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीला समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलावले होते.
पूजा दादलानीचा जबाब नोंदवून मुंबई एसआयटीकडून आज खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे.
या गुन्हयात मुख्य आरोपी किरण गोसावी असणार असून व इतरांना सहआरोपी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजा दादलानीला या गुन्ह्यातील फिर्यादी तर प्रभाकर साईल हा मुख्य साक्षीदार म्हणून असणार आहे.
एनसीबीची एसआयटी पथकदेखील सक्रिय झाली असून आज एनसीबीच्या विशेष पथकाकडून मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी लोअर परळ येथील फिनिक्स मॉल परिसराची पाहणी केली आहे. या परिसरात पूजा दादलानी आणि किरण गोसावी यांच्या १८ कोटींची डील झाली होती, असे म्हटले गेले आहे. या ठिकाणचे फुटेज एनसीबी कडून तपासले जाणार आहे.
एनसीबी एसआयटीचेही समन्स
एनसीबीच्या एसआयटी कडून आर्यन खानसह अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात पूजा दादलानीचा समावेश आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार यांचा देखील पुन्हा जबाब नोंदवण्यात येणार असून लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करून वरिष्ठना अहवाल सादर करायचा असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.