आफताब पॉलीग्राफ चाचणीत उत्तरे देत होता इंग्रजीमध्ये 

आफताब पॉलीग्राफ चाचणीत उत्तरे देत होता इंग्रजीमध्ये 

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या हत्येची सत्यता तपासण्यासाठी पोलिस आफताबची पॉलीग्राफ चाचणी करत आहेत.

गुरुवारी दिल्लीतील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) आफताबची पॉलीग्राफ चाचणी आठ तास चालली. यादरम्यान त्याने हा गुन्हा कसा केला, श्रद्धासोबत त्याचे संबंध कसे होते,यासह अनेक प्रश्नांची त्याला विचारणा करण्यात आली. याशिवाय त्याचं बालपण आणि कुटुंबाशी संबंधित अनेक प्रश्नोत्तरेही विचारण्यात आली.

त्याला हिंदीमध्ये प्रश्न विचारल्यावर आफताब इंग्रजीमध्ये उत्तरे देत होता. सकाळी ११.५० च्या सुमारास पॉलीग्राफ चाचणीला सुरुवात झाली. सुरुवातीला त्याचा रक्तदाब मोजण्यात आला. श्रद्धाच्या हत्येमागील हेतू काय होता, या प्रकरणाची अधिक माहिती आफताबकडून घेण्यात आली. गुन्हा केल्यानंतर तो मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुठे गेला होता.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

या आठवड्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी आफताबच्या कोठडीत वाढ करण्यासाठी आणि त्याच्यावर पॉलिग्राफ आणि नार्को विश्लेषण चाचणी घेण्यासाठी दिल्ली न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पुढील आठवड्यात त्यांची नार्को चाचणी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version