24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

Google News Follow

Related

दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं पोलीस निरीक्षकाला भोवल्याचं दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून बदली करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर जोरदार टीका झाली होती.

राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून थेट विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रशासन विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत.

नो पार्किंगमध्ये बाईक उभी केल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे आली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी तिथे दाखल झाले. यावेळी बाईकस्वार आपल्या बाईकवर बसून राहिला. मात्र पोलिसांनी उद्दामपणा करत त्याला बाईकसह उचलून टोईंग व्हॅनमध्ये ठेवल्याचं समोर आलं होतं. गुरुवार १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला गेला.  वाहनचालक जरी चुकत असेल, तरी अशा पद्धतीने वाहतूक पोलिसाने कारवाई करणं, कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. वाहन उचलणं ठीक, पण वाहनासह चालकालाही उचललं जाण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत पुणेकरांनी व्यक्त केलं होतं.

हे ही वाचा:

६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याला मार लागला असता, तर याला कोण जबाबदार राहिलं असतं? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यानंतर आठवड्याभरातच त्यांची बदली केल्याचं समोर आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा