साहिल नशा करणारा, गुंडांच्या टोळीशी संबंध

पोलिस भक्कम आरोपपत्र तयार करणार

साहिल नशा करणारा, गुंडांच्या टोळीशी संबंध

नवी दिल्लीतील साक्षी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी साहिलवर पोलिस मजबूत आरोपपत्र करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी तांत्रिक आणि वैद्यकीय बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे, जेणेकरून साहिलला कठोर शिक्षा दिली जाईल. आरोपपत्र तयार करण्यासाठी पोलिस अधिकारी राजीव रंजन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

आवश्यकता भासल्यास रविवारी पुन्हा हत्येच्या घटनाक्रमाचे दृश्य पुन्हा घडवून पाहिले जाईल. शवविच्छेदनाच्या अहवालात साक्षीवर चाकूचे १६ वार केल्याचे आढळले असून तिची ७० हाडे तुटल्याचे दिसत आहे. साक्षीची आतडीही बाहेर आल्याचे समजते. नशेच्या अंमलाखाली साहिलने साक्षीच्या शरीराच्या वरच्या भागावर एकामागोमाग एक १६ वार केले होते. या शवविच्छेदन अहवालालाही आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहे.

हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला असून त्याला न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यावरील रक्ताचे अंश काढून ते साक्षीच्या आईवडिलांच्या डीएनएशी जुळवले जाणार आहेत. हत्या करताना साहिलने घातलेले शूज पोलिसांनी त्याच्या आत्याच्या घरातून जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

अपघात झाल्यावर तो रेल्वेतील पंख्याला लटकला होता…

ओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

आठ फोन ताब्यात

साक्षी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रवीण आणि साहिलसह अन्य व्यक्तींशी बोलत असे. काही दिवसांपूर्वी प्रवीणने तिला मेसेजही केला होता. त्याचा स्क्रीनशॉट साक्षीने साहिलला पाठवला होता. त्यावरूनच साहिल भडकला होता आणि त्याने साक्षीची हत्या करण्याचा कट आखण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल आठ फोन जप्त केले असून या सर्व फोनची न्यायवैद्यक तपासणी केली जाणार आहे.

गुंडांच्या टोळीशी संबंध

साहिलचा दिल्ली परिसरातील कृष्णा नामक गुंडांच्या टोळीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या परिसरात जयकुमार आणि कृष्णा यांच्या टोळ्यांची दहशत आहे.

Exit mobile version