धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टवर महाराष्ट्र सायबर पोलिस पथक लक्ष ठेवून आहे, याप्रकारचे पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्याना त्यांच्या इनबॉक्स मध्ये सीआरपीसी कलम १४९ ची नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे. यापूर्वी ४०० जणांना नोटीस पाठवल्या गेलेल्या असून काही जणांना नोटीस पाठविण्यात येत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
राज्यात मागील काही महिन्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र सायबर सेल अश्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ४ विशेष पथके तयार केली आहेत, ही पथके सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवून आहेत.
त्यांच्या युनिटला “सोशल मीडिया मॉनिटरिंग अँड ऍनालिसिस युनिट” असे नाव देण्यात आले आणि यासाठी काही खास सॉफ्टवेअर टूल्सचाही वापर केला जात आहे. पोलीस महानिरीक्षक यादव म्हणाले, गेल्या १५ दिवसांत जातीय पोस्टमध्ये तिपटीने वाढ झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
हे ही वाचा:
भाजपाच्या पोल खोलमुळे दहिसरमध्ये शिवसेना बिथरली
दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या संघ स्वयंसेवकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या!
लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद, मंदिर कायदेशीर आहे का हे तपासणार?
सदावर्तेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा
महाराष्ट्र सायबरने गेल्या चार महिन्यांत १२ हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट डिलीट केल्या आहेत. संबंधित लोकांपैकी ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मशिदीवरून लाऊडस्पीकरचा वाद सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर जातीयवादी पोस्टचे प्रमाणही वाढले असून त्याचा परिणाम सध्याच्या किंवा भविष्यात राज्यातील ‘कायदा व सुव्यवस्थेवर’ होऊ शकतो.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत हजारो पोस्ट शोधून काढल्या आहेत आणि अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी आणि अशा पोस्टमागील लोकांवर दोन प्रकारची कारवाई केली आहे. पोस्ट हटवण्यासाठी प्रथम त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात येत आहे. याशिवाय त्या प्रोफाइलची सर्व माहिती मागवून संबंधित सायबर युनिटला त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जात आहे. धार्मिक भावना दुखवणे अथवा जातीय तेढ निर्माण करणे या सारख्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्याना त्यांच्याच इनबॉक्स मध्ये सीआरपीसी कलम १४९ ची नोटीस पाठविण्यात येत आहे, आता पर्यत महाराष्ट्र सायबर सेलने ४००जणांना याप्रकारच्या नोटीस पाठवले असून आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली असल्याचे सायबर सेल च्या अधिकारी यांनी सांगितले.