कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुण्यात पोलिसांवर उगारला शिक्षेचा दंडुका

पुण्यात दोन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षकांसह सहा जणांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुण्यात पोलिसांवर उगारला शिक्षेचा दंडुका

पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी वारजे मालवाडी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि तिघा पोलिसांना निलंबित केले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी शुक्रवारीच दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह सात पोलिसांना निलंबित करण्याची कारवाई केली होती. या कारवाईला २४ तास उलटत नाही तोच, पोलिस आयुक्तांनी आणखी पोलिसांना निलंबित केले आहे.

 

या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये वारजे मालवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक डी. जी. बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, यशवंत पडवळे आणि जनार्दन होळकर, पोलिस नाईक अमोल भिसे आणि सचिन कुदळे यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

शिंदे-फडणवीस सरकार आता कोसळणार…

वरुण सरदेसाई नीतेश राणेंच्या क्रेडीबिलिटीवर बोलतायत

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

वारजे पोलिस ठाण्यात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर करणे तसेच कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कुख्यात गुंड पपुल्या वाघमारे याच्यावर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा ठपका या निलंबित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

 

या गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश असणारे पत्र या अधिकाऱ्यांना जानेवारी २०२३मध्ये मिळाले होते. मात्र या संदर्भात दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. अशा प्रकारे निष्काळजी दाखवल्यामुळे परिसरातील गुन्हेगार मोकाट सुटले असून गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करून पोलिस आयुक्तांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

 

गेल्या आठवड्यात सदाशिव पेठेत एका कॉलेज तरुणीवर कोयताने हल्ला झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते.

Exit mobile version