मुंबई पोलिसांना उचलावी लागली पावले
साकीनाका येथे झालेल्या अत्यंत घृणास्पद बलात्कारानंतर मुंबई पोलिसांचे डोळे खाडकन उघडले आहेत. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातही बलात्कारांची मालिका सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बलात्काराच्या घटनांना रोखण्यासाठी सूचना केल्या आहेत.
त्यातील काही सूचना अशा-
- पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानके असतील, किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या रेल्वे स्टेशनमध्ये थांबतात अशा रेल्वेस्थानकाच्या बाहेर रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत मोबाईल वाहन उभे करण्यात येणार आहे.
- एकटी महिला दिसली तर विचारपूस करून तिला तिच्या इच्छित स्थळी पाठविण्यात येणार आहे.
- पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेवारस वाहने असल्यास ती हटविण्यात यावीत.
हे ही वाचा:
लोकांना गंडा घालून हॉलिडे कंपनीने लावले टाळे
रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर झाले आता पाणी कसे मुरणार?
लसीकरणात अमेरिकेची का झाली घसरण?
- महिलांसंदर्भातील गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची वेगळी यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची नशा करणारे व बाळगणारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
- अंधाराच्या व निर्जन ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंधाऱ्या जागाच्या ठिकाणी मोबाईल वाहनांची गस्त ठेवावी.
- महिलांची प्रसाधनगृहे असती तिथे महानगरपालिकेतर्फे प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी.
- संशयित इसम दिसल्यास त्या ठिकाणी येण्याचे प्रयोजन काय याची विचारणा करून योग्य ती कारवाई करावी.