गुजरातमधील सुरत येथे गणपतीच्या मंडपावर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले होते. त्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी त्यांना यथेच्छ चोप दिला.
सहा जणांना यासंदर्भात अटक करण्यात आली होती तसेच त्यांना मदत करणारे २७ जणही पोलिसांच्या ताब्यात होते. पोलिसांनी या सगळ्यांना घरातून उचलून आणले. त्यातील अनेकजण आपण या गावचेच नाही असा अविर्भाव दाखवत होते.
नंतर पोलिस ठाण्यातून त्यांना पुन्हा मूळ जागी आणण्यात आले. तेव्हा पोलिसांच्या गाडीतून उतरताना त्यांना चांगला चोप दिल्याचे दिसत होते. हे सगळे आरोपी गाड्यांमधून उतरताना तोलही सांभाळू शकत नव्हते. त्यांना पोलिसांच्या काठीचे फटके खावे लागल्याचे चित्र व्हीडिओतून दिसत होते. अशा प्रकारची दगडफेक उत्सवांवर केली गेली तर त्याचे असेच परिणाम होणार असा सज्जड इशारा गुजरात पोलिसांनी दिला.
हे ही वाचा:
४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा
दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’
वंदे भारत ट्रेनवर झालेल्या दगडफेकीमुळे लाखोंचे नुकसान !
समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सहाय्यक महिलेचाच बलात्कार !
या सगळ्यांच्या अनधिकृत बांधकामांवरही पालिकेने बुलडोझर चालवला आहे. त्याचेही व्हीडिओ आता व्हायरल होत आहेत.
त्याआधी, गणपती मंडपावर दगडफेक करण्यात आल्यामुळे सुरतमधील वातावरण तापले होते. हिंदूंनी पोलिस ठाण्याबाहेर गोळा होत या घटनेचा निषेध केला आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली.