छोटा राजनचा वाढदिवस केला मोठा, पोलिसांचा पडला सोटा

बॅनर लावणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई

छोटा राजनचा वाढदिवस केला मोठा, पोलिसांचा पडला सोटा

कुख्यात डॉन छोटा राजन याचा वाढदिवसाचे बॅनर लावून वाढदिवस साजरा करणे एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. बॅनर लावणाऱ्या ६ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विरुद्ध कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ जानेवारी रोजी कुख्यात डॉन छोटा राजन याचा वाढदिवस झाला. छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात असून त्याच्यावर मुंबईसह भारतात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

हे ही वाचा:

आता या राजकीय नेत्याच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

मातोश्रीचे भागीदार, माफीचे साक्षीदार बनतील का?

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स

शिवसेनेच्या चिन्हाचा धनुष्य बाण कुणाच्या भात्यात ?

तो स्वतःची एक टोळी चालवतो. मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील राजन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सी. आर.सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई’ या नावाच्या संघटनेने तानाजी नगर या ठिकाणी छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर लावून त्या बॅनरवर छोटा राजनचा फोटो आणि आजूबाजूला सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कुरार व्हिलेज पोलिसांनी या बॅनरबाजीची दखल घेऊन हे बॅनर उतरवून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहाही जणांना नोटीस पाठविण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version