25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाचार हजार खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; दंड वसूल

चार हजार खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; दंड वसूल

५१४ बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले

Google News Follow

Related

राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार २७७ खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत १ कोटी ८३ लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त १७०२ बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या ८९० बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली ५७० खाजगी बसेसवर, तर ५१४ बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.

 

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी १६ मे ते ३० जून २०२३ दरम्यान विशेष मोहिम राबविली.

 

सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करतांना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्माची शतके आणि विक्रमी भागीदारी

 

विविध गुन्ह्यांसाठी कारवाई

मोटार वाहन कर न भरणाऱ्या ४८५ बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या २९३ बसेस, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतुक करणाऱ्या २२७ बसेस, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या १४७ बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी ७२ बसेस, जादा भाडे आकारणी करणाऱ्या ४० बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहिम राबविण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा