आग्र्यातील प्रकाश नगरमध्ये शुक्रवारी पोलिसांच्या तत्परतेमुळे एका हिंदू मुलीचा ‘निकाह’ रोखला गेला. दोन महिन्यांपूर्वी आग्र्यातील तरुण नोएडातून तरुणीला पळवून घेऊन गेला होता. तरुणी अलिगढची रहिवासी आहे. नोएडाच्या सूरजपूर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे. तरुण-तरुणी एका फॅक्टरीमध्ये एकत्र काम करत होते.
पोलिसांना कळवल्यानंतर नोएडा पोलिस लवकरच आग्र्याला पोहोचत असून त्या दोघांना ते घेऊन जातील. प्रकाशनगरचा राहणारा साहिल सहा महिन्यांपूर्वी नोएडाला गेला होता. तेथील सूरजपूरमध्ये तो एका फॅक्टरीत काम करू लागला. तिथे त्याची भेट अलिगढच्या तरुणीशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. एप्रिलमध्ये साहिल तिला पळवून घेऊन गेला. तिच्यासोबत ग्वाल्हेरमध्ये राहू लागला. त्याने तिचे धर्मांतरण केले आणि तिचे नाव रुखसार ठेवले, असा आरोप आहे.
हे ही वाचा:
मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीट करणाऱ्याकडे ठाणे पोलिसांनी मागितला नंबर
सुप्रियाताई म्हणतात त्याप्रमाणे लोकसंख्या वाढली की घरं भरलेली वाटतील!
दोन दिवसांपूर्वी तो आग्र्याला गेला. तो तिथे तिच्याशी ‘निकाह’ करणार होता. पिलाखारमधील एका भवनमध्ये निकाहची तयारीही सुरू होती. मौलवीची प्रतीक्षा केली जात होती. चार वाजता मौलवी येणार होता. स्थानिक लोकांना याबाबत कळल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वेळेत पोहोचून साहिलची धरपकड केली. तरुणीची चौकशी केल्यावर ती हिंदू असल्याचे व अलिगढमध्ये राहात असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी सूरजपूर पोलिसांशी संपर्क साधला. आता तिचे नातेवाईक तिला घेऊन जाण्यासाठी येत आहेत. तरुणीला नोएडा पोलिसांकडे सोपवले जाईल, अशी माहिती आग्रा पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती या विभागातील नगरसेवक विजय वर्मा यांना दिली. वर्मा यांनी या घटनेबद्दल पोलिस निरीक्षक राजकुमार यांच्याकडे दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नंतर सूरजपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि तिथे मुलगी हरवल्याची तक्रार नोंदविल्याची माहिती पोलिसांना मिळाली.