26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा'रॉन्ग साईड ड्रायव्हिंग' करणाऱ्यांना रेड सिग्नल

‘रॉन्ग साईड ड्रायव्हिंग’ करणाऱ्यांना रेड सिग्नल

मुंबईत २० हजार वाहन चालकांवर कारवाई

Google News Follow

Related

‘रॉन्ग साईड ड्रायव्हिंग’ (विरुद्ध दिशेने) वाहने चालवून वाहतूक कोंडी करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहन चालकावर मुंबई पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यान मुंबई शहरासह उपनगरातील २० हजार २०४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांनी ७२लाख रुपयांचा दंड आणि ३०८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. तसेच १४८८वाहन चालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील बहुतांश वाहन कोंडी आणि अपघात हे वाहन चालकांच्या चुकीच्या दिशेने वाहन चालविल्यामुळे होत आहे.

विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्या आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसांकडून ६एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशाने वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त प्रविणकुमार पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरासह उपनगरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती, या दरम्यान मुंबईसह उपनगरामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या २० हजार २०७ वाहन चालकांवर कारवाई करून सुमारे ७२ लाख ९५००रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून १४८८वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

हे ही वाचा:

विषण्ण!! प्रेयसीसाठी मुलाचा खून करून मृतदेह टाकला खाडीत

एमयूटीपी ३ अ प्रकल्पाला नवसंजीवनी, लोकलचा प्रवास होणार वेगवान

२००५ मध्ये खंडणी मागितली, अटक झाली २०२३मध्ये

हिंदू धर्म, गाय, देवीदेवतांवरून ब्रिटनच्या शाळांत हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, अपमान

दरम्यान २१९४ वाहन चालकांचे परवाने आणि ३०९ वाहने वाहतूक विभागाने जप्त केली असून ३०८ वाहन चालकाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ही कारवाई यापुढे देखील अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाच्या एका अधिकारी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा