माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून पळणाऱ्या हल्लेखोरांचा पाठलाग करून दोघाना निर्मल नगर पोलिसांनी मोबाईल चोर म्हणून ताब्यात घेतले, परंतु हे मोबाईल चोर नसून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे हल्लेखोर असल्याचे कळताच पोलीस देखील हादरले. ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोरांच्या झडतीत पोलिसांनी दोन अत्याधुनिक पिस्तुल, चार मॅगझीन आणि २८ जिवंत काडतुसे या दोघांकडून जप्त करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप (१९) आणि हरियाणातील गुरमेल सिंग (२३) यांना निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून त्यांचा तिसरा साथीदार शिवा घोरी हा फरार होण्यास यशस्वी झाला. दरम्यान गुन्हे शाखेने ताब्यात असलेल्या दोन्ही हल्लेखोरांच्या चौकशीत चौथ्या आरोपीचे नाव समोर आले आहे, मोहम्मद झिशान अख्तर असे त्याचे नाव असून या दोघांचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे १५ पथके तयार करण्यात आलेली आहे. ही पथके हरियाणा, उत्तर प्रदेश, पुणे आणि पनवेल येथे आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
वांद्रे पूर्व येथे शनिवारी रात्री माजी आमदार बाबा सिद्दीकी हे मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालय येथे आले होते, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दीकी हे घरी जाण्यासाठी निघाले असताना खेर नगर येथून देवीचे विसर्जन होते, विसर्जन मिरवणुकीत आतिषबाजी सुरू असताना हल्लेखोरांनी आतिषबाजीच्या आवाजाचा फायदा घेत आपल्या वाहनात बसण्याच्या तयारीत असताना बाबा सिद्दीकीवर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या, आतिषबाजीच्या आवाजामुळे गोळ्या झाडल्याचा आवाज कळला नाही,परंतु काही तरी गडबड झाली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले.
हे ही वाचा:
ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे पिंपरीत आयोजन
आरोपी गुरुनैलला पोलीस कोठडी तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी!
सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार
सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार
त्या वेळी हल्लेखोर पळत असताना स्थानिकांनी मोबाईल चोर असल्याचे समजून त्यांचा पाठलाग केला, त्याच वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या तिघांचा मोबाईल चोर समजून पाठलाग केला, एकाला जाळीचे कंपाउंडवरून उडी मारताना पकडले तर दुसरा हल्लेखोर हा जवळच असलेल्या एका बागेत शिरला, आणि तिसरा आरोपी गर्दीत मिसळून फरार झाला.बागेत लपलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले, तो पर्यत पोलिस त्यांना मोबाईल चोर समजत होते, परंतु काही वेळातच हे बाबा सिद्दीकीवर गोळीबार करणारे आरोपी असल्याचे कळताच पोलीस देखील हादरले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही हल्लेखोरांना निर्मल नगर पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेण्यात आली असता दोघांकडे दोन अत्याधुनिक पिस्तुल, ४ मॅगझीन आणि २८ जिवंत काडतुसे मिळून आली आहे.