दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी मुलाखतीमधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
स्वाती मालीवाल यांनी घटनेचा क्रम सांगताना म्हटले की, १३ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तिथे कर्मचाऱ्यांनी त्यांना केजारीवाला भेटायला येतील असा निरोप देऊन ड्रॉईंग रूममध्ये बसवले. मात्र, तिथे बिभव कुमार आला आणि मारहाण करू लागला, असं त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितले की, बिभवने सात-आठ वेळा मारले. तेव्हा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पाय धरला आणि खाली ओढले. तेव्हा डोके टेबलवर आदळले आणि मी खाली पडले. मग त्यांनी लाथा मारायला सुरुवात केली. आरडाओरडा करूनही कोणीही वाचवायला आले नाही, असं स्वातील मालीवाल म्हणाल्या. १३ मे रोजी केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पोलिसांनी १६ मे रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवून बिभव कुमारला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
पुढे स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना आवाहन केले आहे की, पोलिसांनी त्यांची पॉलीग्राफ चाचणी करावी जेणेकरून सर्व चित्र स्पष्ट होईल. मालीवाल यांच्या हल्ल्याच्या दाव्यावर आप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या दिवशी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मालीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या दिवशी त्यांच्या मोबाईल फोन व्हिडिओचा संदर्भ देत, आप मंत्री आतिशी म्हणाल्या की मालीवाल यांचे कपडे फाटलेले नाहीत आणि व्हिडिओमध्ये तिच्या डोक्याला कोणतीही दुखापत नाही. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणीही मालीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे व्हिडीओ एडीटेड असून काही भाग व्हायरल केल्याचा दावा मालीवाल यांनी केला आहे.
हे ही वाचा:
डोंबिवली आगीची परिस्थिती नियंत्रणात, ४ मृत्यू!
हमासने अपहरण केलेल्या इस्रायली महिला सैनिकांवरील अत्याचाराचा नवा व्हीडिओ समोर
पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!
“काँग्रेसला दिलेलं मत व्यर्थ; सात जन्मातही सत्ता येणार नाही”
स्वाती मालीवाल असं म्हणाल्या की, “मी २० वर्षांपासून या लोकांशी संपर्कात आहे. काम केले आहे. पण, आता माझ्यासोबत कोणी नाही. माझ्या विरोधात बोलण्यासाठी पक्षातील लोकांना धमकावले जात आहे. माझ्या मित्र मंडळींकडून व्हिडीओ, फोटोस मागवले हात आहे. जेव्हा मी ‘आप’च्या कामासाठी अमेरिकेत गेली होती, तेव्हा मी ज्या स्वयंसेवकांसोबत राहिली होती त्यांना बोलावून व्हिडिओ देण्यास सांगितले जात होते. संपूर्ण ट्रोल आर्मी, संपूर्ण यंत्रणा माझ्या मागे लावून ठेवली आहे,” असा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.