23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामानांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

Google News Follow

Related

नांदेडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत रविवार, ८ मे रोजी तालवारी जप्त केल्या आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून हा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातील दशमेश फायनान्स या कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकत पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुनील सिंह आडे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजी नगर पोलिसांनी या कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली. या धाडीत १० तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान आरोपीने या तलवारी कुठून आणि कशासाठी आणल्या याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले.

हे ही वाचा:

तारापूरमध्ये स्टील कारखान्याच्या कामगारांवर जमावाचा हल्ला, १९ पोलीस जखमी

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

यापूर्वी नांदेडमध्ये २५ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. पंजाब राज्यातून रेल्वेने त्या तलवारी नांदेड येथे पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरासह जिल्हाभरात पोलिसांचे जोरदारपणे धाडसत्र सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा