मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त

मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त

मुंबईमधील रेशनिंगच्या दुकानातील काळाबाजारीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत गहू आणि तांदूळ जप्त केला आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान आठ ते दहा कोटींचा माल जप्त केला असून २० लोकांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमधील आरे कॉलनी परिसरामध्ये आरे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

आरे पोलिसांना रेशनिंग दुकानात वाटल्या जाणाऱ्या गहू, तांदळाचा साठा करून काळाबाजरी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरे पोलिसांनी मध्यरात्री रेशनिंग इन्स्पेक्टरला सोबत घेऊन आरेमध्ये असलेल्या एका गोदामात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी सहा ट्रकसोबत आठ ते दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त केले आहेत. तसेच कारवाई दरम्यान २० जणांना ताब्यात घेतले आहे. या गोदामात हा रेशनिंगचा मोठा साठा जमा करून त्या ठिकाणाहून हा माल खासगी वाहनांमध्ये भरून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काळाबाजार केला जाणार होता.

हे ही वाचा:

विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला

चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

टाटांचा महिलांसाठी ‘हा’ अभिमानास्पद निर्णय

सध्या आरे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई  एफसीयायच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुढील चौकशी करत आहेत.

Exit mobile version