शाळेजवळ सुरू असणारे ७ कुंटणखाने बंद, ३३ महिलांची सुटका

काँग्रेस हाऊस जवळ केली कारवाई

शाळेजवळ सुरू असणारे ७ कुंटणखाने बंद, ३३ महिलांची सुटका

शाळेपासून अवघ्या दोनशे मीटरवर सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापे टाकून ३३ महिलांची या कुटंणखान्यातून सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या विरोधात पिटा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून येथील ७ कुंटणखाने बंद करण्यात आले आहेत.

ही कारवाई ग्रॅंटरोड येथील काँग्रेस हाऊस या ठिकाणी मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ग्रॅंट रोड येथील कॉंग्रेस हाऊस, नूर मोहम्मद बेग कंपाउंड या ठिकाणी एका खाजगी शाळेपासून २०० मीटर अंतरावर कुंटणखाना सुरू असून त्या ठिकाणी महिलांकडून बळजबरीने देह विक्री करून घेण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलीसांच्या अंमलबजावणी विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली.

या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पथकासह या ठिकाणी छापा टाकला, या छाप्या दरम्यान नूर मोहम्मद बेग कंपाउंड या ठिकाणी ७ वेगवेगळ्या खोल्यामध्ये महिलेकडून दोन भाऊ बळजबरी देहविक्री करून घेत असल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

इस्रायलच्या लष्कराने हमासच्या ताब्यातून केली २५० ओलिसांची सुटका

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’

 

पोलिसांनी टाकलेल्या छाप्या दरम्यान ३३ महिलांची सुटका करण्यात आली आहे, तसेच २५ जणांना अटक करण्यात आली.या प्रकरणी पिटा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस आयुक्त यांनी येथील ७ कुंटनखाने २महिण्याकरिता बंद करण्याचे आदेश दिले आहे.

Exit mobile version