25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामासरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...

सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…

दोन साधू पालघर जिल्ह्यातील गावात आढळले आणि पुन्हा संशयाने त्यांच्याकडे गावकऱ्यांच्या नजरा वळलया

Google News Follow

Related

जवळपास ३ वर्षांपूर्वी भारतात कोविडने हळूहळू विळखा घालायला सुरुवात केली होती तेव्हा पालघर जिल्ह्यात साधूंचे हत्याकांड झाले होते. या हत्याकांडाच्या आठवणी अजूनही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्या साधूंना पोलिसांनी लोकांच्या ताब्यात दिले आणि त्या साधूंना ठेचून ठेचून मारण्यात आले.

तीन वर्षांनी पालघरमध्येच अशीच घटना घडणार होती, मात्र पोलिसांनी यावेळी सावधगिरी बाळगत साधूंना संशयाने पाहणाऱ्या लोकांपासून वाचविले. त्याचे घडले असे की पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनाई गावात दोन जण संशयितरित्या फिरत आहेत अशी शंका स्थानिकांना आली. हे दोघेही साधूच्या वेशातच होते. मुले पळवणारी टोळीच्या भीतीपोटी या दोन साधूंकडे त्याच नजरेने पाहिले जाऊ लागले.

रविवारी सकाळी ११.३०च्या सुमारास हे साधू स्थानिकांना दिसले आणि हळूहळू २५०-३०० लोकांचा जमाव जमला. मात्र एक गावकरी हरेश्वर गुल्हे यांना यात काहीतरी धोका दिसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. पोलिसांच्या पथकाने लागलीच गावात प्रवेश करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वास्तव काय ते जाणून घेतले. बापूनाथ शेगर आणि प्रेमनाथ असे हे दोन साधू मग पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसले आणि त्यांना सुखरूप पोलिस ठाण्यात आणले गेले.

तिथे त्यांची चौकशी केल्यावर लक्षात आले की, हे दोघेही नाथ जोगी पंथाचे असून यवतमाळचे आहेत. भविष्य सांगणे हा त्यांचा व्यवसाय आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि तिथे आपल्या व्यवसायातून पोटापाण्याची व्यवस्था करणे हा त्यांचा दिनक्रम. गुजरातमधील वलसाडमध्ये काही महिने घालवल्यानंतर ते पालघरला आले. तिथे गावात फिरत असताना लोकांना त्यांचा संशय येऊ लागला आणि लोक जमले.

हे ही वाचा:

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

सिक्कीममधील नाथुलाजवळ हिमस्खलन,६ पर्यटकांचा मृत्यू

भय इथले संपत नाही…

पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले आणि नंतर पालघर स्टेशनला सोडले. तिथून ते अन्यत्र रेल्वेने निघून गेले. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, सध्या पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी एक पोलिस नियुक्त केलेला आहे. त्याचा फोन नंबर गावकऱ्यांना दिलेला आहे. अशी काही घटना घडली की गावकरी त्या पोलिसाला फोन करून परिस्थितीची जाणीव करून देऊ शकतात. एक गाव एक पोलिस या मोहिमेचा असा फायदा झाला.

शिवाय, पोलिस गावकऱ्यांशी नियमित संपर्क ठेवून आहेत अशा काही अफवा आल्या तर कशाप्रकारे परिस्थिती हाताळायची याचीही माहिती पोलिसांकडून गावकऱ्यांना दिली जाते. २०२०मध्ये मात्र कल्पवृक्ष गिरी (७०), सुशील गिरी (३५) आणि त्यांचे चालक निलेश तेलगडे (३०) यांची लोकांनी ठेचून हत्या केली होती. रात्री ९.३० वाजता त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला झाला होता.

पोलिसांच्या ताब्यात असतानाही पोलिसांनी लोकांच्या ताब्यात या लोकांना दिल्याचे अनेक व्हीडिओ तेव्हा समोर आले होते. त्यावरून तत्कालिन महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले होते आणि या प्रकरणात त्यांनी हयगय केल्याचेही आरोप तेव्हापासून आजतागायत होत आहेत. मात्र आता लोक भावना व्यक्त करत आहेत की, सरकार बदलले आणि पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा