आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी

जमावाने केला होता हल्ल्याचा प्रयत्न

आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी

कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बस भीषण अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी बस चालक संजय मोरे याला मारहाण केली, मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानंतर पोलिसांनी संतप्त जमावाच्या तावडीतून चालकाची सुटका करून त्याची ओळख पटवून नये म्हणून त्याला एका पोलीस कॉन्स्टेबलचे टी शर्ट घालून दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर संतप्त झालेला जमाव आरोपीच्या शोधात पोलीस ठाण्यात आला असता त्यामुळे आरोपीला दुसरीकडे हलवणे गरजेचे होते, संतप्त जमावापासून त्याला वाचविण्यासाठी आम्हाला त्याचे कपडे बदलावे लागले.

हे ही वाचा:

हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात सिंधुदुर्गात ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रा’

सीरियामधून ७५ भारतीयांचे यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी संतप्त जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. बस चालक दारूच्या नशेत होता, या संशयातून जमावाने बस चालक संजय मोरे याला बस मधून बाहेर काढले, त्याच वेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

एका पोलीस अधिकाऱ्याने बस चालकाला संतप्त जमावाच्या तावडीतुन सोडवत त्याला पोलीस ठाण्याकडे नेले. आरोपी बस चालक आणि पोलिसांच्या पाठोपाठ संतप्त जमाव देखील येऊ लागला. पोलिसांनी जमावाला पांगवून बस चालक संजय मोरेला सुरक्षित स्थळी आणले, मात्र कुठल्याही क्षणी जमाव पोलीस ठाण्याकडे येतील या भीतीने पोलिसांनी तात्काळ आरोपी बस चालक मोरे याला त्याचे कपडे काढण्यास सांगून एका पोलीस कॉन्स्टेबलचे टी शर्ट घातले आणि आरोपीला छुप्या मार्गाने दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.

या प्रकारे कुर्ला पोलिसांनी बस चालक संजय मोरे याला संतप्त जमावा पासून वाचवले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. आरोपी संजय मोरे याचा काळ्या रंगातील टी शर्ट मधील फोटो व्हायरल होत आहे तो टी शर्ट एका पोलीस कॉन्स्टेबलचा आहे.

Exit mobile version