मुंबई पोलिसाच्या ट्विटर हँडलमुळे वाचले तरुणाचे प्राण

मुंबई पोलिसाच्या ट्विटर हँडलमुळे वाचले तरुणाचे प्राण

लॉकडाऊन मुळे नोकरी गेल्यामुळे कर्जाबाजारी झालेल्या तरुणाने नैराश्यापोटी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ट्विटर या सोशल मीडियावर टाकली होती. या सुसाईड नोट वरून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या तरुणाचा शोध घेऊन त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

अमीर असे या तरुणाचे नाव आहे. विरार येथे राहणारा अमीर हा उच्चशिक्षित आहे. एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरीला असणाऱ्या अमीरची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. लॉकडाऊनच्या काळात अमीर याच्याकडे कंपनीची काही रक्कम होती ती रक्कम त्याने खर्च केली, तसेच अनेक ठिकाणाहून कर्ज काढले. कर्ज फेडू शकत नसल्यामुळे तसेच कंपनीचे खर्च केलेले पैसे भरू न शकल्याने कंपनी आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करील, या भीतीने अमीरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

त्याने आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजी मध्ये दोन पानाचे सुसाईड नोट तयार केले त्यात आपली सर्व व्यथा मांडली आणि आपण आयुष्य संपवतो असे त्यात नमूद केले. ही सुसाईड नोट त्याने ट्विट करून मुंबई पोलीस, सलमान, शाहरुख खान, मनोज वाजपेयी, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि बराक ओबामा यांना टॅग करून मदतीची विनंती केली. मुंबई पोलिसाच्या ट्विटर हँडलवर आलेल्या या सुसाईड नोटची तात्काळ दखल घेण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आमीरचा पत्ता शोधला असता अमीर हा विरार येथे राहत असल्याचे कळले.

हे ही वाचा:

मंडीमध्ये मोदींनी सुरु केले ५० हजार कोटींचे प्रकल्प

राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून

अकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?

वसाहतवादी न्यायशास्त्र सोडा, मनू, कौटिल्य, बृहस्पतींचे न्यायशास्त्र अंगिकारा!

 

मुंबई पोलिसांनी तात्काळ विरार पोलिसांना याबाबत कळवून अमीर याचा पत्ता दिला. विरार पोलीस ठाण्याचे पो.उ.नी वाघ यांनी तात्काळ अमीरच्या पत्त्यावर जाऊन आत्महत्येच्या तयारीत असलेल्या आमिरला रोखून त्याची समजूत काढली. अमीर याचे समुपदेशन करण्यात आले असून त्याच्या अडचणीतून काही तरी मार्ग काढू, असे आश्वासन त्याला देण्यात आले आहे.

Exit mobile version