कर्जबाजारी झाल्यामुळे कंटाळलेल्या एका वकिलाने नाशिकहून मुंबईत येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मुंबई पोलिसांनी त्याचा तो प्रयत्न हाणून पाडला.
फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट टाकून नाशिक जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या वकिलाचा घाटकोपर पोलिसांनी शोध घेऊन पवईतील डोंगराळ भागातून ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले. या वकील तरुणाचे पोलिसांनी समुपदेशन करून त्याला नातेवाईकाच्या ताब्यात दिले.
कर्जबाजारी झाल्यामुळे या वकील तरुणाने आत्महत्येचा निर्णय घेऊन आत्महत्या करण्यासाठी घाटकोपर येथे आला होता, अशी माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली.
परमदेव अहिरराव असे या तरुणाचे नाव आहे.परमदेव हा पेशाने वकील असून नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे राहणारा आहे. कर्जबाजरी झाल्यामुळे तसेच व कर्ज फेडू न शकल्याने परमदेव हा मुंबईतील घाटकोपर पश्चिम गोळीबार रोड येथे राहणाऱ्या नातलगाच्या घरी आला होता.
रविवारी सायंकाळी परमदेव याने फेसबुक वर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकून नातलगाच्या घरातून निघून गेला होता. आत्महत्या करीत असल्याची पोस्ट वाचून अनेकांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद लागत नसल्यामुळे त्याचा संपर्क होऊ शकत नसल्यामुळे नातलग असलेल्या महिलेने घाटकोपर पोलीस ठाणे गाठले . वरिष्ठ पोलिस निरीक्षक आगरकर, पो. नि. कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. बांगर, पिसाळ व पथक हे तात्काळ या परमदेव याच्या शोधासाठी गोळीबार परिसरात रवाना झाले.
पोलिसांनी परमदेव यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन काढले असता ते लोकेशन पवई येथील डोंगरावर असलेल्या जंगलात आढळून आले. पोलीस पथक पवईच्या जंगलाकडे शोध घेत असताना त्या ठिकाणी एका दरीकडे परमदेव हा आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आला.
हे ही वाचा:
सांगलीत पकडले अडीच कोटींचे रक्तचंदन
म्हणून किया कंपनीने लाखो कार परत मागवल्या!
पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शोवर या तारखेपर्यंत बंदी
हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम
पोलीस पथकाने त्याची समजून काढत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याचे समुपदेशन करून त्याला नातलगाच्या ताब्यात दिले. परमदेव हा मागील काही वर्षांपासून कर्जबाजारी झाला होता, कर्ज फेडू शकत नसल्यामुळे कर्ज देणाऱ्याचा ससेमिरा मागे लागल्यामुळे त्याने नाशिक मधून मुंबईत नातलगाचे घर गाठले होते. तेथून त्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या करण्यासाठी तो वाट मिळेल तिथे निघाला आणि पवईच्या डोंगरावर येऊन पोहचला होता, अशी माहिती आगरकर यांनी दिली.