न्यूड फाेटाेशूट प्रकरणामुळे अभिनेता रणवीर सिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. या फाेटाेशूटपासून रणवीर सिंह खूप चर्चेत असून काही अनेकांनी त्याच्या या वर्तवणुकीबद्दल स्पष्ट शब्दात नाराजीही व्यक्त आहे. इतकच नाही तर या प्रकरणी रणवीर सिंहच्या विराेधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल मुंबई पाेलिसांनी घेतली आहे. शुक्रवारी पोलीस नोटीस घेऊन रणवीरच्या घरी गेले होते मात्र तो बाहेर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.रणवीर मुंबईत परतल्यानंतर मुंबई पोलीस पुन्हा एकदा नोटीस देणार आहेत .
रणवीरने गेल्या महिन्यात एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्यानंतर तो अचानक प्रकाशझोतात आला होता. ज्याने ही छायाचित्रे पाहिली, तो आश्चर्यचकित झाला कारण या फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे न्यूड होता.रणवीर सिंगने नंतर एका मुलाखतीत सांगितले की, त्याला हवे असेल तर तो १००० लोकांसमोर न्यूड होऊ शकतो कारण त्याला त्याची पर्वा नाही, पण जर त्याने असे केले तर लोक नक्कीच अस्वस्थ होतील.
हे ही वाचा:
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
चेंबूर पोलिसांनी अभिनेता रणवीर सिंगवर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नग्न छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील वकील वेदिका चौबे यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात लेखी अर्ज सादर केला होता. चौबे यांनी आपल्या तक्रारीत अभिनेत्याने आपल्या छायाचित्रांद्वारे सर्वसामान्य महिलांच्या भावना दुखावल्या आणि त्यांच्या नम्रतेचा अपमान आरोप केला आहे
मुंबईत आल्यावर नोटीस स्वीकारणार
रणवीरला २२ऑगस्टपूर्वी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.अद्याप रणवीर सिंगला नोटीस देण्यात आली नाही मात्र १६ तारखेला तो मुंबईत परतणार असून तेंव्हा नोटीस स्वीकारु शकेन असं त्यानं कळवलं आहे..