तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले

सीसीटीव्ही फुटेजमध्ये फुटले बिंग

तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यातील ‘दहशतवाद विरोधी सेल’ च्या पथकातील पोलिस अधिकाऱ्यासह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. तबेला मालकाच्या केअर टेकरच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना सीसीटीव्हीमध्ये कॅमेरात कैद झाल्यामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले होते.

खार पोलीस ठाण्याचे ‘दहशतवाद विरोधी सेल’ च्या पथक शुक्रवारी सांताक्रूझ पूर्व कलिना या ठिकाणी असलेल्या एका तबेल्यात आले. त्यांनी तबेल्याचा मालक शाहबाज खान आहे का असे तेथे काम करणाऱ्या डॅनियलकडे चौकशी केली. खान तबेल्यात नसल्याचे बघून साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी डॅनियलच्या अंगझडती घेण्याच्या निमित्ताने एका पोलिस कॉन्स्टेबलने सोबत आणलेली एमडी ड्रग्सचे पाकीट त्याच्या खिशात टाकले आणि तू ड्रग्स विक्री करतो असे बोलून त्याला खारदांडा येथील चौकीत घेऊन आले.

हे ही वाचा:

पतंजलीच्या ‘दिव्य मंजन’मध्ये माशांचा अर्क असल्याचा दावा

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा गौरव

२२ जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता !

राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांचे सरकार बनले तर भारताचा पाकिस्तान-बांगलादेश होईल !

हा सर्व प्रकार तबेल्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. डॅनियल च्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना फुटेज मध्ये स्पष्ट दिसून येत असल्यामुळे पोलिसांची पोलखोल झाली.

हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच, पोलिसांनी डॅनियलला सोडून देत तबेला मालकाला हे फुटेज डिलीट करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविले असे स्वतः तबेला मालक याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अखेर हा व्हायरल व्हिडीओ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यापर्यत गेल्यानंतर त्यांनी तात्काळ डॅनियल आणि तबेला मालक यांना शनिवारी बोलावून घेत त्यांचा जबाब नोंदवून एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांना निलंबित केले आहे.

Exit mobile version