‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेल मध्ये जेवणाचे बील दिले म्हणून हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील याच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

वाकोला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील हे सर्व मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हद्दीतच असणाऱ्या हॉटेल स्वागत बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर पाटील यांच्याकडे जेवणाचे बील मागितले असता पाटील यांनी हॉटेलच्या व्यवस्थपकाला मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार हॉटेल मध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल आहार या संघटनेने घेतली होती. दरम्यान आहार संघटनेकडून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
गुरुवारी रात्री विक्रम पाटील यांच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी शुक्रवारी विक्रम पाटील यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

हे ही वाचा:

शुक्रवार मध्यरात्रीपासून राज्यभर नवे निर्बंध; जाणून घ्या!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

पंजाबच्या राजकारणाला मिळणार नवी ‘फिरकी’?

नवजात बालकांच्या मृत्युस ही कंपनी जबाबदार; तिचे कंत्राट रद्द करा!

 

मंगळवारी रात्री १२ वाजता वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकारी पाटील हे जेवायला हॉटेल स्वागत मध्ये गेले होते, जेवणानंतर साध्या वेषात असणाऱ्या पाटील साहेब बसलेल्या टेबलावर वेटरने जेवणाचे बील दिले. बिल बघितल्यावर पाटील संतापले आणि जेवणाच्या बिलावरून काउंटरवर असलेल्या व्यक्तीसोबत त्यांची शाब्दिक वाद सुरू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील साहेबानी माझ्याकडे बील मागतात का ? असा सवाल करीत काउंटर वर असलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली, आणि हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. हे प्रकरण वाकोला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यत पोहोचले आणि प्रकरणाची अधिक वाच्यता नको म्हणून पाटील यांना हॉटेल मालकाची माफी मागण्यास सांगितली.

Exit mobile version