मागील वर्षभरापासून मुंबई पोलिसांना भ्रष्ट्राचाराचे ग्रहण लागलेले असताना साकिनाक्यात आणखी एक भ्रष्टाचाराची घटना घडली आहे. सकिनाका पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षक लाचेची रक्कमच घेऊन पळाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीणकुमार पवार असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. प्रविणकुमार हे सकिनाका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. साकिनाका परिसरातील तक्रारदार आपला मुलगा परिसरात झालेल्या भांडणात जखमी झाल्यामुळे त्याला घेऊन सकिनाका पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळी आले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रविणकुमार पवार यांनी त्यांची तक्रार दाखल न करता त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यानंतर पवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल फोन घेऊन फोन परत पाहिजे असल्यास १० हजार रुपयांची मागणी केली.
हे ही वाचा:
‘उत्तर प्रदेशची जनता घराणेशाहीचा पराभव करेल’
बँकेत ओळख पटवण्यासाठी हिजाब हटविण्यास मुस्लीम विद्यार्थिनीचा नकार
‘आता हा देश पाकिस्तान झाला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी देश सोडा’
एक डाव प्रशांतचा…. की पवारांचा ???
लाचेची रक्कम द्यायची नसल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकिनाका पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला असता लाचेचा पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये पवार याने स्वीकारले, परंतु सापळा रचल्याचे कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रविणकुमार पवार यांनी लाचेच्या रकमेसह तेथून पळ काढला.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रवीण कुमार पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखक केला आहे. मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार काही संपत नाही, पोलीस अधिकारी लाचेची रक्कम घेऊन पळाला