पंजाब मधील लुधियाना येथील शहर न्यायालयात गुरुवारी २३ डिसेंबर रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आले आहे. माजी पोलीस कर्मचाऱ्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. गगनदीप सिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गगनदीप याला २०१९ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर दोन वर्षे गगनदीप तुरुंगात होता, अशी माहिती पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणूक जवळ आल्याने लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने देशभरात खळबळ उडाली होती.
Ludhiana Court Blast Case | The deceased person, former policeman Gagandeep Singh was carrying the explosion. He was dismissed from service in 2019 and spent two years in jail following his arrest in a drug-trafficking case: Punjab DGP Siddharth Chattopadhyaya pic.twitter.com/wmaGR3qrWL
— ANI (@ANI) December 25, 2021
बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. गगनदीप सिंग असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे तपासातून पुढे आले आहे.
हे ही वाचा:
नितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी
पालिकेचे सफाई कर्मचारीच करतायत कचरा
‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’
सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र
या स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता. केंद्र सरकारकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घटनेबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आला होता. अधिक तपासासाठी एनएसजी आणि एनआयए पथकही लुधियानात पाठवण्यात आले होते.