रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा काय होते याची प्रचिती नाशिक मधून आली आहे. नाशिक मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दीपक जठार असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. दीपक जठारच्या या कृत्यासाठी त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे.

अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख असल्याचा या पोलिसाकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी त्याचा परिचय होता. याचाच गैरफायदा घेऊन त्याने या मुलीला फूस लावली आणि पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक

ही घटना समोर येताच नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलां विरोधातील निरनिराळ्या गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशातच ज्यांच्याकडून रक्षणाची आणि मदतीची अपेक्षा करायची ते पोलीसच जर मुलींना पळवून नेत असतील तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे बघायचे? हा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

Exit mobile version