परमबीर यांच्यावरील आरोपप्रकरणी घाडगेंना सीआयडीकडून समन्स

परमबीर यांच्यावरील आरोपप्रकरणी घाडगेंना सीआयडीकडून समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अकोला पोलीस दलात असलेल्या पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग( सीआयडी) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याप्रकरणी सीआयडीने तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना चौकशीसाठी हजर राहण्याकरिता समन्स जारी केले आहे. आता या चौकशीतून काय निष्पन्न होते, हे लवकरच उलगडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

म्युकर मायकोसिसने पिंपरी चिंचवडला वेढले

तौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी

ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे हे अकोला येथील मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत आहेत.  यापूर्वी ते ठाणे पोलीस दलात होते. २० एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्री, राज्य पोलीस महासंचालक, गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध लेखी तक्रारअर्ज केला होता. या अर्जात घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांच्यावर हा  भ्रष्टाचाराचा आरोप करून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाची चौकशी  सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. सीआयडीने या संदर्भात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी १९ मे रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोकण भवन नवीमुंबई येथे हजर राहावे, असे नमूद केले आहे.

परमबीर यांच्यासह २६ पोलिस अधिकाऱ्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अकोला येथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. विविध २७ कलमे या सगळ्यांवर लावण्यात आली आहेत. त्यात कट, पुरावे नष्ट करणे, अट्रोसिटी आदिंचा समावेश आहे.

Exit mobile version