पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. तडकाफडकी बदली झाल्याने नाराज झालेल्या पुण्यातील कारागृह अधीक्षकाने इच्छा मरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकरणाची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सरकारभोवती संकटाचं हे वादळ घोंगावत असतानाच पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली होत असेल तर मला इच्छा मरण द्यावे, असं म्हटलं आहे.
माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृहखात्यातील अर्थकारणामुळेच हा प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप करत मला इच्छा मरणाची परवानगी न दिल्यास परवानगी असल्याचं गृहित धरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
केंद्र सरकारचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही
घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते
सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यांना होमगार्डचे प्रमुख केले होते. मात्र ही आपली पदावनती असल्याने सिंह नाराज झाले होते. तसेच सिंग यांची बदली करताना त्याचे कारणही दिले नव्हते. आपल्याला होमगार्ड सारखं दुय्यम दर्जाचं डिपार्टमेंट देणं ही शिक्षा असल्याची भावना निर्माण झाल्यानेच त्यांनी थेट गृहमंत्र्यांचे कारनामे एका लेटरद्वारे बाहेर काढले होते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमध्ये सुरु असलेल्या पोलिसांच्या बदलीच्या घोटाळ्याची माहिती दिली होती.