तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचे आरोप

तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचे आरोप

मुंबईमधील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये पीआय, एपीआय आणि पीएसआय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी एकाच पोलीस ठाण्याचे असल्याने खळबळ उडाली आहे. पीआय ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

भुलेश्वर येथील अंगाडिया असोसिएशनकडून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पीआय ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगाडिया यांना आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असणाऱ्या याच अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यात आठ करोड रुपयांच्या सोन्याच्या केसचा छडा लावला होता. इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करून सोने हस्तगत केल्यावर सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या अधिकाऱ्यांचे कौतुक केले होते.

हे ही वाचा:

अफगाण हिंदू-शीख शिष्टमंडळाने भेट घेऊन पंतप्रधान मोदींचे मानले आभार

‘मुख्यमंत्र्यांनी शिवनेरी नाही, निदान शिवाजी पार्कमध्ये तरी उपस्थित राहायला हवे होते’

देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा

सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेच्या सीआययु कक्षाकडे दिले असून याचा तपास सुरू आहे. सीआययुने एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांना अटक केली आहे. तसेच अजून कोणाकडून खंडणी वसूल केली आहे का? याचा तपासही सुरू आहे.

Exit mobile version