भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात काही ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्येही आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. दरम्यान, एका तरुणीने फेसबुकवर पोस्ट टाकली असता तिला थेट मुर्शिदाबाद पोलिसांनी तुरुंगात टाकल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमधील अश्विनी नावाच्या तरुणीने फेसबुकवर आंदोलनासंबंधी एक पोस्ट टाकली होती. त्यात तिने असं लिहिले होते की, “आंदोलन कर्त्यांनी सगळ्याची तोडफोड करण्यापेक्षा देश सोडून जावा. हे म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे.” असा संदेश लिहिला होता. मात्र, यानंतर मुर्शिदाबाद पोलिसांनी थेट या तरुणीला तुरुंगात टाकल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे वकील शशांक झा यांनी दिली आहे. तसेच पोलिसांना संपर्क केला असता पोलीस व्यवस्थित उत्तरं देत नसल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी तिच्या घराचे नुकसान केल्याची माहितीही झा यांनी दिली आहे.
This is Aishwini from West Bengal.
She put a Facebook post:
“Riotèrs can leave the country instead of damaging everything”Later, Beldanga Police of Murshidabad arrested her.
Police is refusing to give information over call.@NCWIndia @smritiirani pic.twitter.com/yMesQJyt5p
— Shashank Shekhar Jha (@shashank_ssj) June 11, 2022
या तरुणीची माहिती मिळताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हे काय सुरू आहे? सत्तेत असलेले लोक काहीही करत असतात, अशा काही प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा:
मिशेल प्लॅटिनी यांचा खुलासा; १९९८ च्या फुटबॉल विश्वचषकाचा ड्रॉ फिक्स
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक
‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’
‘आमदार सांभाळता न येणं याला संजय राऊत जबाबदार’
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उसळला होता. हल्लेखोरांनी जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, हावडा, बेलडांगा, मुर्शिदाबादमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तसेच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, हावडा आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.