काश्मीरमधील पुलवामा येथे एका पोलीस कॉन्स्टेबलवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेणं सुरू असून अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही.
पुलवामा येथील गुडूरा या गावात दहशतवाद्यांनी रियाझ अहमद ठोकरवर घरात घुसून गोळ्या झाडल्या. रियाझ यांच्या छाती आणि डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यानंतर दहशतवादी फरार झाले. हल्ल्यानंतर रियाझ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
हे ही वाचा:
एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती
कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार
रायपूर विमानतळावरील हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. बुधवार, १२ मे रोजी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून राहुल भट्ट नावाच्या एका काश्मीरी पंडिताची हत्या केल्याची घटना घडली होती. राहुल भट्ट हे एक सरकारी कर्मचारी होते आणि दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. दोन दिवसांत घडलेल्या या दोन हत्या असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.