23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

Google News Follow

Related

काळा चौकी फेरबंदर येथील संघर्ष नगर या ठिकाणी घरातून गुढरीत्या बेपत्ता झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचे गूढ उकलण्यात आले आहे. या मुलीचे अपहरण अथवा चोरी न होता आईनेच मुलीची हत्या करून मृतदेह घरातील पिंपात दडवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्नालय या ठिकाणी पाठवण्यात आला असून आई सपना मकदुम (२९) हिला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पहिली मुलगी त्यानंतर दुसरीही मुलगी झाल्यामुळे सपना नाराज होती. तिला मुलगा हवा असल्यामुळे तिने स्वतःच्या पोटची तीन महिन्यांनी मुलगी वेदा हिची हत्या करून मृतदेह पिंपात दडवून ठेवला होता. त्यानंतर तिने मुलगी चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, काल याच घटनेवरून मुंबईत मुले चोरणारी महिला टोळीने एका तीन महिन्यांच्या मुलीची घरातून चोरी केल्याची घटना मुंबईतील काळाचौकी येथे उघडकीस आली होती. या महिला टोळीतील महिला प्रथम घराची रेकी करून त्यानंतर फेरीवाले बनून घरातील एकट्या दुकट्या महिलांना बेशुद्ध करून मुलं चोरी करीत असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात मुलीच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघीना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबईतील घोडपदेव येथील फेरबंदर, संघर्ष नगर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारी महिला सपना मकदुम या दुपारच्या सुमारास आपल्या तीन महिन्यांच्या वेदा या मुलीसह घरी एकट्या होत्या. या दरम्यान जुन्या मोबाईल फोनवर तसेच कपड्यावर भांडे विक्री करणारी एक महिला फेरीवाली आली होती. सपनाचे साडेतीन महिन्यांचे बाळ खाटेवर होते तर सपनाने या फेरीवाल्या महिलेकडे लहान बाळाचे कपडे ठेवण्यासाठी बास्केट आहे का विचारले असता या महिलेने तिला बास्केट दाखवले असता सपना या आतल्या खोलीत जुने मोबाईल घेण्यासाठी वळताच या महिलेने गुंगीचे औषधाने भरलेला रुमाल सपनाच्या नाका तोंडावर लावला, असे तक्रारीत नमूद केले होते.

हे ही वाचा:

सावरकर हे पर्मनंट भारतरत्न…त्यांचा अपमान करू नका!

ओमिक्रॉनचा भारतात प्रवेश; कर्नाटकमध्ये आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण

पेन्टोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने पश्चिम रेल्वे रखडली

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले जीवन

 

सपना बेशुद्ध होताच या फेरीवाल्या महिलेने त्याच बास्केटमध्ये सपनाने खाटेवर ठेवलेले साडेतीन महिन्याचे बाळाला पळवले. पती कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताबडतोब परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सपना मकदुम राहत असलेल्या इमारतीतून तीन महिला बाहेर पडताना दिसून आल्या. तसेच रस्त्यावरील फुटेज मध्ये एका महिलेचा कुशीत सपनाचे बाळ असल्याचा संशय आला. या फुटेजवरून पोलीस या महिलांचा शोध घेतला आणि तीन महिलांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. पण ते चोरलेले मूल मिळाले नव्हते. आता मात्र ही पूर्ण घटना बनावट होती आणि या महिलेनेच आपल्या मुलीची हत्या करून मृतदेह पिंपात टाकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा