पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस उपनिरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

पोलिस निरीक्षक सूर्यवंशीला केले निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस उपनिरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणारा भंडारा पोलिस दलातील पोलिस उप निरीक्षक सचिन सूर्यवंशी याला निलंबित करण्यात आले आहे. सूर्यवंशीविरोधात प्राथमिक स्वरूपाची तक्रार करण्यात आली आहे.

भंडारात पोलिस दलात काम करणारा सचिन सूर्यवंशी काही काळापासून नेता आणि भारतीय प्रशासन व्यवस्थेवर टीका करत होता. पण फेसबुकवर त्याच्याशी संबंधित लोकांची संख्या कमी असल्यामुळे तितक्या प्रमाणात त्याच्या पोस्ट चर्चेत नव्हत्या. मात्र काही काळापासून ज्याची गंभीरपण दखल घ्यावी अशा आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट करू लागल्या.

नेता, त्यांचे नातावाईक आणि धार्मिक आयोजनाशी संबंधित वैमनस्य निर्माण होईल, अशा पोस्ट करू लागला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसियाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सूर्यवंशीविरोधात २९४, २९५ (अ), ५००, ५०४ आयटी ऍक्ट ६७ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशीला निलंबित केले.

हे ही वाचा:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत

गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात

आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

 

सूर्यवंशी हा शिपाई म्हणून नागपूर पोलिस दलात भर्ती झाला होता. याआधीही वादविवादांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. गणपती बाप्पासंदर्भातही त्याची एक पोस्ट चर्चेत होती आणि त्यावर संताप व्यक्त केला गेला होता. नैवेद्य म्हणून मांसाहारी थाळीचा फोटो त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटला टाकला होता. फेसबुकवर तो सक्रीय होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत कोणताही फरक पडला नाही.

नागपूरच्या बजरंग दलाच्या नागपूर शाखेनेही त्याच्याविरोधात तक्रार केली. महाप्रसाद म्हणून मांसाहारी थाळी दाखविल्याची ही तक्रार होती. त्याला अटक करण्यात यावे असे या तक्रारीत म्हटले होते. नागपूर पोलिसांकडे ही तक्रार बजरंग दलाने केली होती.

Exit mobile version