25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाकाश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. फारुख अहमद मीर असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणली आहे.

फारुख यांचा मृतदेह सांबुरा येथील भाताच्या शेतात पडलेला आढळला. फारुख हे सीटीसी लेथपोरा येथे आयआरपी 23 व्या बटालियनमध्ये ओएसआय म्हणून तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून फारुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रथम फारुख यांचे अपहरण करून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काल आलेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात सुरक्षा दलाने  हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर यापूर्वीही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू काश्मिर पोलिसांना आणि सुरक्षा दलाला यश आले आहे.

हे ही वाचा:

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत होत्या. त्यानंतर सुरक्षा दलाने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. या मोहिमेत सुरक्षा दलाला यश मिळत असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा